PMGSY चे 747 कोटी रुपये पडून

PMGSY चे 747 कोटी रुपये पडून

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या (PMGSY) अंमलबजावणीसाठी राज्यांना निधीचे वाटप करणे हे राज्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे केले जाते.

आणि त्याबरोबरच इतर गोष्टींचाही समावेश यामध्ये होतो

१) हाती असलेली कामे,

२) राज्याची अंमलबजावणी क्षमता

३)आणि राज्याकडे उपब्ध असलेली निधी (न खर्च केलेला निधी ) यावर अवलंबून असते.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या ( PMGSY ) अंतर्गत प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निधी मंत्रालयाद्वारे संपूर्णपणे राज्यासाठी जारी केला जातो. जिल्हा स्तरावर कार्यक्रम अंमलबजावणी युनिट्स (PIUs) साठी निधीचे पुढील वितरण संबंधित राज्यांकडून करावयाच्या खर्चावर अवलंबून असते.

आज दिनांक 20/07/ 2023 पर्यंत महाराष्ट्र राज्याकडे 747 कोटी रुपये एवढा निधी पडून आहे असे लेखी उत्तर संसदेमध्ये बोलताना केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिले https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1942379

PMGSY चे 747 कोटी रुपये पडून असूनही वाडीवस्त्यांवर रस्ते होऊ शकत नाहीत

 

काल दिनांक 26/०7/2023 रोजी इगतपुरी तालुक्यातील एका गरोदर महिलेला व मोखाडा तालुक्यातील शेंडेपाडाच्या एका गरोदर महिलेला रस्त्या अभावी आपले प्राण गमवावे लागले आज एवढा निधी उपलब्ध असूनही वाडी वस्त्यांवरच्या लोकांच्या नशिबी शिमगाच असेल तर हा निधी काय फक्त लाटण्यासाठी मंजूर केला आहे काय.

आज आम्ही राष्ट्राला समृद्धी महामार्ग अर्पण केला उद्या बुलेट ट्रेन अर्पण करू पण या देशाचा आत्मा खेड्यापाड्यात वाडी वस्त्यांमध्ये आहे त्यांच्यासाठी त्यांना दैनंदिन जीवन जगता येईल अशे रस्ते केव्हा बांधणार

https://www.google.com/amp/s/www.saamtv.com/amp/story/maharashtra/pregnant-women-had-to-travel-from-river-in-mokhada-palghar-news-sml80

https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/nashik/maharashtra-nashik-news-igatpuri-pregnant-woman-dies-in-igatpuri-taluka-due-to-lack-of-road-1195655/amp

 

आज आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाचा आत्मा ज्या वाडी वस्त्यांवरती खेड्या पाड्यांमध्ये आहे तेथील लोकांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी पुरेसे रस्ते नाहीत पण शासन आपल्या दारी अशा उपक्रमांच्या जाहिरातींवर 50 ते 60 कोटी रुपये खर्च केले जातात आज आम्ही अमृत महोत्सव साजरा करत असतानाही कोणत्या बाबींना प्राधान्य द्यायचं हे आम्हाला कळत नसेल तर आम्हाला आमच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची गरज आहे

 

https://indianjem.com/15-lakhs-cr-loan-write-off/#more-2895

Leave a Reply

%d bloggers like this: