15 लाख कोटी रुपये बुडीत खात्यात वर्ग

  1. बँकांनी उद्योगपतींना दिलेले 15 लाख कोटी रुपये बुडीत खात्यात वर्ग

सन 2012 ते 2023 दरम्यान उद्योगपतींना दिलेले पंधरा लाख कोटी बुडीत खात्यात वर्ग करण्यात आलेDeepstambh

  भारताच्या रिझर्व बँकेने द इंडियन एक्सप्रेस या संस्थेने केलेल्या आरटीआय अर्जाला उत्तर देताना म्हटल आहे की मागील तीन वर्षांमध्ये अनुक्रमे mar 2021 मध्ये 2.03 लाख करोड, मार्च 2022 मध्ये 1.74 लाख करोड, मार्च 2023 मध्ये 2.09 लाख करोड अशी एकूण 5.86 लाख करोड एवढी रक्कम बुडीत खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. 

ही रक्कम बुडीत खात्यामध्ये वर्ग केल्यामुळे बँकांच्या एनपीए ने मागील दहा वर्षांचा निश्चांक गाठला आहे बँकांचा ताळेबंद (Ballance sheet) स्वच्छ करण्यासाठी एनपीए बुडीत खात्यामध्ये वर्ग करणे कितपत योग्य आहे ? आणि हे अजून किती दिवस चालणार आहे ? 

मागील तीन वर्षांमध्ये बुडीत रकमेपैकी 5.86 लाख करोड पैकी केवळ  १.०९ लाख करोड एवढी रक्कम बँकांना वसून वसूल करण्यात यश मिळाले आहे (18.6%) 

 आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार बुडीत खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी 62% रक्कम ही सरकारी बँकांची आहे ( पब्लिक ,पीपल ,जनतेच्या ) 

गांभीर्याची बाब म्हणजे ही रक्कम (पंधरा लाख कोटी बुडीत खात्यात वर्ग केलेली ) कोणत्या व्यक्तींना किंवा कोणत्या संस्थांना वितरित केली गेली आहे याची माहिती आमच्याकडे  ( आरबीआय कडे )असत नाही ही माहिती संबंधित बँकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे असते ! 

मूलभूत प्रश्न हा आहे की वारंवार जनतेचा किती पैसा आणि किती वेळा बुडीत खात्यामध्ये वर्ग करणार आहात ? 

 त्याहीपेक्षा मूलभूत प्रश्न हा आहे कृषीप्रधान देशांमध्ये अन्नदात्यासाठी करेल काय एखादं सरकार सरकार राइट ऑफ 

    माहिती साठी 

१ ) एँसेट :बँकांनी कर्जदारांना दिलेल्या रकमेचा हप्ता नियमित येत असेल तोपर्यंत ही रक्कम बँकांसाठी ( संपत्ती ) ऍसेट असते

 २) एनपीए : कर्जदार बँकांनी दिलेल्या कर्जाचा हप्ता मुद्दल किंवा व्याज मागील 90 दिवसांमध्ये भरू शकला नाही तर ही रक्कम बँकांसाठी एनपीए असते ( नॉन परफॉर्मिंग ऐसेट ) 

३) राईट ऑफ ( बुडीत कर्ज ) : अशी रक्कम ज्या रकमेची वसुली होणं खूपच अशक्य आहे किंवा होऊ शकत नाही अशा रकमेला राईट ऑफ बुडीत कर्ज असे म्हणतात

1 thought on “15 लाख कोटी रुपये बुडीत खात्यात वर्ग”

Leave a Reply

%d bloggers like this: